


Shri 1008 Bhagwan Parshvnath Digamber Jain Mandir Atishaya Kshetra Ratnatraypuram, Kanganpur, , Kognoli, District - Sangli (Maharashtra)
Kognoli, Sangli, MAHARASHTRA
Temple History
Digamber Jain Atishaya Kshetra in Kognoli, Sangli Credit: Shri Milind Halingale The Kangnoli area of Kavathemahankal taluka in Sangli district has historical evidence that it may have been dominated by Jain feudal lords in the past. Therefore, there is not a single house of Jain community in this village now. Their temples and idols must have been buried under the ground to protect them from parachakra during migration. In the year 1965, while excavation of white soil for construction of house was going on, suddenly in the underground, in the well-known 11th century Mulnayak Khadgasan, in a good condition, there was a beautiful Shri 1008 Bhagwan Parshvanath Tirthankar image, 24 Tirthankar images and other images. There is a Kannada inscription on the image of Parshvanath Tithankar. From this it is known that It is believed that this idol was erected in the temple of Jain feudal lords by Ingleshwar kings in the 11th century. At present when there is no house of Jain community in this village, the Jain listeners from outside the village as well as the villagers of this village arranged to place the idol in the Hanuman temple in this village. The idols were kept in the Hanuman Temple for 21 years from 1965 to 1986. Later, some of the listeners in our community suggested that the idol should be taken to a village with Jain community instead of this village, but the villagers of this village did not consent to it out of their devotion. As he insisted that they should be established in our village, the decision to create an area in the village of Kongnoli was taken by all the Jain listeners. After that some of the listeners from our community took the initiative and registered the trust in 1986 AD. Arranged Nityapuja Abhishek, under the guidance of Tyagi, started the construction by planning to build an idol-like Hemadpanthi temple and the construction of this beautiful Hemadpanthi temple started at a fast pace and was completed till the temple construction foundation. After that the work was stopped for some reason. After that, some listeners and trustees went to Mangi-Tungi to visit the area. During the visit of Acharya Shri 108 Jinsenji Maharaj, the listeners and trustees informed Acharya Shri about the area and while discussing, Maharaj expressed the possibility of coming. Mangi - After visiting the Tungi area, on 11 April 2016, Acharya Shri's Sangh arrived in the area. After that, after discussing with the old trustees, new trustees were appointed and the development of the area was started once again with great vigor. An ancient idol of Parshvanath Tirthakar was enthroned on the throne in the new temple on February 6, 2017. After that Shikhar, Manastambha, Muni Niwas, Muni Ahargriha Mandir Sabha Mandap, Yatri Niwas, Nayanmanohar Bagicha and Brihad Ratnatrya Murti and Bh Munisuvratnath, Bh. Vasupujya, b. The work of enthroning the idols of Neminath Tirthankara is going on with the invaluable guidance of Acharya and with the cooperation of all of us. After completing all these works, Lord Shantinath, b. Kunthunath, b. Arhanath, Bh Munisuvratnath, Bh. Vasupujya, b. Neminath as well as Manasthambhopari, b. Panchkalyanak Prestige of Parshwanath Tithankar and New Jinmandir Mahamahotsav Sunday, dt. May 8, 2022 to Saturday, d. As there is no Jain community in the village of Kongnoli, it is planned to be done by 14th May 2022. Assuming that you are the listener of this very area, you should participate in the Panchkalyanak Puja of this very area and make the most of Pune. This is a request to accumulate virtue. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी या परिसरात पुर्वी जैन सामंताचे वर्चस्व असावे असे ऐतिहासीक दाखले आजही या परिसरात मिळतात परकीय आक्रमणाच्या काळात हा समाज विखुरला गेला वा विस्थापीत झाला असावा . त्यामुळे या गांवात आता जैन समाजाचे एकही घर नाही . स्थलांतरीत होतेवेळी आपली मंदिरे व मुर्ती परचक्रापासून सुरक्षित रहाव्यात म्हणून त्या जमिनीखाली गाडून ठेवणेत आल्या असाव्यात . इसवी सन १ ९ ६५ मध्ये घर बांधणेसाठी पांढरी माती खोदणेचे काम चालू असताना भुगर्भामध्ये अचानक ११ व्या शतकातील प्रतिष्ठीत मुलनायक खडगासन स्थित सुस्थितीत असलेली मनोज्ञ श्री १००८ भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर प्रतिमा चोवीस तीर्थंकर प्रतिमा अन्य प्रतिमा मिळाल्या यामधील भ . पार्श्वनाथ तिथंकरांच्या प्रतिमेवर हळी कन्नड शिलालेख आहे . त्यावरून असे कळते की , इ.स. ११ व्या शतकात इंगळेश्वर राजांच्या हस्ते जैन सामंताच्या मंदीरात या मूर्तीची प्रतिष्ठा झालेली होती असे समजते . सद्या या गावी जैन समाजाचे एकही घर नसताना बाहेरच्या गावातील जैन श्रावकांनी तसेच या गावातील ग्रामस्थांनी या गावातीलच हनुमान मंदिरात मुर्तीची तात्पुर्ती ठेवणेची व्यवस्था केली . सन १ ९ ६५ ते १ ९ ८६ पर्यंत २१ वर्षे मुर्ती हनुमान मंदिरामध्येच ठेवण्यात आल्या . नंतर आपल्या समाजातील काही श्रावकांनी या गावाऐवजी जैन समाज असलेल्या गांवी या मुर्ती नेवुन तिथे त्यांची प्रतिष्ठा करावी असा विचार मांडण्यात आला मात्र या गांवातील ग्रामस्थांनी आपल्या श्रध्देखातर यांस संमत्ती दिली नाही . आमच्या गांवातच त्यांची स्थापना करावी असा आग्रह त्यांनी धरल्याने कोंगनोळी या गांवातच क्षेत्र निर्माण करणेचा निर्णय समस्त जैन श्रावकांकडून घेणेत आला . त्यानंतर आपल्या समाजातील काही श्रावकांनी पुढाकार घेवून इसवी सन १ ९ ८६ मध्ये ट्रस्ट नोंद केला व स्ववर्गणी तसेच लोकवर्गणीतून सलगरे रेल्वे स्टेशनजवळ कोंगनोळी - सलगरे रोड लगत कवठेमहांकाळ व मिरज तालुक्याच्या सिमेवर प्रशस्त अशी जागा खरेदी केली व पत्र्याचे शेड तयार करुन त्या मंदीरातून आणून शेडमध्ये स्थापना केली व नित्यपुजा अभिषेकची व्यवस्था केली , त्याजागी त्यागींच्या मार्गदर्शनाखाली मुर्तीस साजेसे हेमाडपंथी मंदिर बांधणेचे नियोजन करून बांधकामास सुरूवात केली व सुंदर असे हेमाडपंथी मंदीर बांधकाम गतीने सुरू झाले ते मंदीर बांधकाम फौंडेशन पर्यंत पुर्ण झाले . त्यानंतर काही कारणास्तव हे काम बंद झाले . त्यानंतर काही श्रावक व ट्रस्टीगण मांगी - तुंगी येथे क्षेत्र दर्शनास गेले असता प.पू. आचार्य श्री १०८ जिनसेनजी महाराज यांची भेट घेतली या भेटीमध्ये श्रावक व ट्रस्टींनी आचार्यश्रींना क्षेत्राची माहिती दिली व चर्चा केली असता महाराजांनी येणेची संभावना व्यक्त केली . मांगी - तुंगी क्षेत्राहून विहार करत ११ एप्रिल २०१६ रोजी आचार्यश्रींचे क्षेत्रावर ससंघ आगमन झाले . तद्नंतर जुन्या ट्रस्टींशी चर्चा करून नवीन ट्रस्टींची नेमणूक केली व क्षेत्र विकासास पुन्हा एकदा जोमाने सुरूवात झाली सन १ ९ ८६ ते २०१६ या ३० वर्षांच्या कालावधीत पत्र्याच्या शेडमध्ये असणाऱ्या मुलनायक भ . पार्श्वनाथ तिर्थकरांची पुरातन मुर्ती नुतन मंदिरातील सिंहासनावर ६ फेब्रुवारी २०१७ रोजी विराजमान करण्यात आली . त्यानंतर शिखर , मानस्तंभ , मुनि निवास , मुनि आहारगृह मंदीर सभा मंडप , यात्री निवास , नयनमनोहर बगीचा व बृहद रत्नत्रय मुर्ती व भ मुनिसुव्रतनाथ , भ . वासुपूज्य , भ . नेमिनाथ तीर्थंकरांची मुर्ती विराजमान करण्यात आल्या हे सर्व काम आचार्यश्रींच्या अनमोल मार्गदर्शनाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालु आहे . हे सर्व काम पुर्ण करुन भगवान शांतिनाथ , भ . कुंथुनाथ , भ . अरहनाथ , भ मुनिसुव्रतनाथ , भ . वासुपुज्य , भ . नेमिनाथ तसेच मानस्तंभोपरी , भ . पार्श्वनाथ तिथंकरांची व नुतन जिनमंदिराचे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव रविवार , दि . ८ मे २०२२ ते शनिवार , दि . १४ मे २०२२ पर्यंत करण्याचे नियोजन केले असुन कोंगनोळी या गावामध्ये जैन समाज नसल्याने आपणच या अतिशय क्षेत्राचे श्रावक - श्राविका आहात असे माणून तरी आपण या अतिशय क्षेत्रावरील पंचकल्याणक पुजेमध्ये सहभागी होवून अपार सम्यक पुण्याचा अलभ्य लाभ करुन घ्यावा आपल्या न्यायोपार्जित चंचलारुपी धनाचा सदुपयोग या अतिशय क्षेत्राच्या विकासासाठी करुन पुण्य संचय करुन घ्यावे हि विनंती .
Temple Category
Temple Timings
Morning Hours
Morning: 5:30 AM - 11:30 AM
Evening Hours
Evening: 5:30 PM - 8:30 PM
Plan Your Visit
How to Reach
By Train
Train: Sulgare Railway Station
By Air
Air: Kolhapur Airport
Location on Map
Nearby Temples in Sangli
Shree 1008 Mahaveer Swami Digambar Jin Mandir, Bha...
Bhayandar West
Shri Mahaveer Swami Kundkund Kahan Digamber Jain M...
Borivali West
Shri Simandhar Swami Digamber Jain Mandir, Swami V...
Borivali
Shree Shantinath Digamber Jain Kaanch Mandir, Shiv...
Shirdi
Explore More Temples




दान करे (Donate now)
हम पूजा, आरती, जीव दया, मंदिर निर्माण, एवं जरूरतमंदो को समय समय पर दान करते ह। आप हमसे जुड़कर इसका हिस्सा बन सकते ह।